Posts

Image
               भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल लिहिताना अंगावर शहारे विचारांना धार आणि लेखणीला वेग आपोआपच येतो. एकेकाळी आपल्या भारतभूला सोने की चिडिया म्हटलं जायचं.                अशा या परम पवित्र भारतभूमीला गोऱ्यांनी बेचिराख करून टाकलं होतं जनसामान्यांचा हक्क हिरावून घेऊन गुलामगिरी लादली होती सारेजण ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीत गुदमरुन गेले होते यामुळेच कधी एकदा आपण या ब्रिटिशांच्या साखळदंडातुन मुक्त होऊ याची प्रत्येकजण चातकासारखी वाट पाहत होता आणि यातूनच भारत मातेच्या कुशीतून एक एक नर रत्ने जन्माला येऊ लागली, जसे की टिळक,सावरकर,भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि असे अनेक अनामवीर. 'अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात'       आज मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे अशाच एका अनामवीराची.  कहाणी नरसिंह वामन जोशी यांची.            श्री.नरसिंह वामन जोशी म्हणजे माझे पणजोबा. कर्नाटकातील खडकलाट या छोट्याशा खेडेगावातला त्यांचा जन्म. परिसरा...